चेन्नई :
ऑटोमोबाइल क्षेत्रातील कंपनी टीव्हीएस मोटर्स यांनी पहिल्या तिमाहीचा निकाल घोषित केला असून कंपनीने सदरच्या कालावधीत 468 कोटी रुपयांचा निव्वळ नफा प्राप्त केला आहे. जो वर्षाच्या आधारावर पाहता 46 टक्के अधिक आहे. दुचाकी विक्रीतील चांगली कामगिरी यासाठी कारणीभूत ठरली आहे. यादरम्यान कंपनीच्या आयक्यूब या इलेक्ट्रिक दुचाकीला ग्राहकांची मोठी पसंती मिळत असल्याचे समजते. सदरच्या तिमाहीत कंपनीने 9.53 लाख दुचाकी-तिचाकी वाहनांची विक्री केली आहे.









