बेंगळूर
पेय पदार्थ सादर करणाऱया कोकाकोला इंडिया कंपनीने आर्थिक वर्ष 2022 मध्ये 460 कोटी रुपयांचा निव्वळ नफा नोंदवला आहे. मागील वर्षाच्या तुलनेमध्ये 3 टक्के इतकी वाढ नफ्यामध्ये दिसली आहे.
याचबरोबर कंपनीच्या महसुलामध्ये 35टक्के इतकी वाढ झाली असून 3121 कोटीचा महसूल आर्थिक वर्षात प्राप्त केला आहे. 31 मार्च 2021 ला संपलेल्या वर्षात कंपनीने 443 कोटीचा नफा तर 2297 कोटीचा महसूल प्राप्त केला होता. आर्थिक वर्षात एकूण उत्पन्न 3192 कोटी रुपयांवर पोहोचले आहे. जे मागील समान अवधीच्या तुलनेमध्ये 35 टक्के अधिक आहे. कंपनीचा खर्च 46 टक्के वाढून 20548 कोटींवर पोहोचला आहे.









