उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या प्रयत्नांना यश
प्रतिनिधी/ रत्नागिरी
दाओस येथील वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये सहभाग होण्यासाठी गेलेले राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या प्रयत्नातून राज्यात 46 हजार कोटींची गुंतवणूक मिळाली आह़े यासंबंधीचे करार नुकतेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याच्या उपस्थितीत करण्यात आल़े यामुळे सुमारे 10 हजार लोकांना प्रत्यक्ष रोजगाराच्या संधी निर्माण होणार असल्याची माहिती मंत्री उदय सामंत यांनी दिली.
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उद्योगमंत्री उदय सामंत हे दाओस दौऱयावर आहेत़ या ठिकाणी विविध कंपन्यांसोबत राज्याच्यावतीने सामंजस्य करार करण्यात आले आहेत़ दाओस येथे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आह़े या परिषदेत विविध उद्योजक, देशांचे प्रतिनिधी सहभागी होतात़ राज्यात गुंतवणूक वाढावी, यासाठी दाओस येथे महाराष्ट्र पॅव्हेलियन उभारण्यात आले आह़े येथे राज्याच्या प्रगतीचे प्रभावी दर्शन घडवले जात आह़े
दाओसमध्ये झालेल्या प्रमुख सामंजस्य करारात ग्रीनको एनर्जी प्रोजेक्टच्यावतीने 12 हजार कोटी गुंतवणूक, बर्कशिर हॅथवे होम सर्विसेस ओरेंडा इंडियाने 16 हजार कोटींची गुंतवणूक, आयसीपी इनव्हेस्टमेंट व इंडस पॅपीटल 16 हजार कोटींची गुंतवणूक, रूखी फुड्स 480 कोटी, निप्रो फार्मा पॅकेजिंग 1 हजार 650 कोटी आदी गुंतवणूकसंदर्भात सामंजस्य करार करण्यात आले आहेत़ यावेळी मुख्यमंत्री व उद्योगमंत्री यांच्यासोबत प्रधान सचिव हर्षदीप कांबळे, एमआयडीसी मुख्य कार्यकारी अधिकारी विपीन शर्मा, टी, कृष्णा आदी राज्याचे अधिकारी उपस्थित होत़े









