ऑनलाईन टीम/तरुण भारत
चीनच्या (china) सिचुआन प्रांतात भूकंप झाला असून, ४६ जणांचा मृत्यू झाला आहे. सोमवारी दुपारी झालेल्या भूकंपामुळे (Earthquake News) अनेक इमारतींना हादरे बसलेत. चीनमधील दक्षिणपूर्व भागात ६.६ रिश्टर स्केल तीव्रतेचे धक्के जाणवले. भूकंपामुळे अनेक घरांचं नुकसान झालं असून अनेक इमारती जमीनदोस्त झाल्या आहेत. मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून, अनेक ठिकाणी अद्यापही बचावकार्य सुरु आहे.
अमेरिकेतील भूगर्भीय सर्वेक्षणानुसार, सिचुआन प्रांतातील कांगडिंग शहराच्या दक्षिण-पूर्वेस सुमारे ४३ किलोमीटर अंतरावर ६.६ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला. या भूकंपामध्ये आतापर्यंत ४६ जणांचा मृत्यू झालाय. मृतांचा आकडा वाढण्याची दाट भीती व्यक्त केली जाते आहे. या भूकंपाची तीव्रता ६.६ रिश्टर स्केल इतकी नोंदवण्यात आलीय. अनेकजण भूकंपाच्या हादऱ्याने जखमी झालेत. रेस्क्यू ऑपरेशन जारी आहे. चीनची सरकारी वृत्तसंस्था शिन्हुआने चीनमध्ये (China) भूकंप झाल्याची माहिती जारी केली. सोमवारी स्थानिक वेळेनुसार दुपारी १२ वाजून २५ मिनिटांत भूकंप झाल्याची माहिती देण्यात आली आहे.
चीनमधील सिचुआन प्रांतात भूकंपामुळे प्रचंड हानी झालीय. सिचुआन प्रांतामधील लुडिंग काऊंटीमध्ये सोमवारी दुपारी भूकंपाचे तीव्र झटके जाणवले. भूकंपाच्या केंद्रबिंदूपासून हा भाग जवळपास २२६ किलोमीटर दूर आहे. या भूकंपाचे काही व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आले आहेत. या व्हिडीओमध्ये थरकाप उडवणारी दृश्यं कॅमेऱ्यात कैद झाली आहेत.
सिचुआन प्रांतीय आपत्कालीन व्यवस्थापन विभागाचे उपसंचालक वांग फेंग यांनी चेंगडू येथे पत्रकार परिषदेत सांगितले की, सोमवारी रात्रीपर्यंत १६ लोक बेपत्ता आणि ५० हून अधिक जखमी झाले आहेत. भूकंपामुळे इमारतींचे नुकसान झाल्यानंतर ५० हजाराहून अधिक लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे, ज्यामध्ये आतापर्यंत ४६ लोकांचा मृत्यू झाला आहे.