शहरी भागापेक्षा ग्रामीण भागातील शाळांची अवस्था भयावह : काही शाळांचे छप्पर कमकुवत, भिंती जीर्ण : वेळीच दुरुस्ती होणे आवश्यक
प्रतिनिधी /बेळगाव
बेळगाव शैक्षणिक जिल्हय़ात शेकडो शाळा मोडकळीस आल्या असून, त्या शाळांच्या दुरुस्तीकडे अद्याप प्रशासनाचे दुर्लक्षच झाले आहे. त्यामुळे मागील चार दिवसात झालेल्या जोरदार पावसामुळे अनेक शाळा कोसळल्या आहेत. बेळगाव शैक्षणिक जिल्हय़ातील 457 वर्गखोल्या मोडकळीस आल्या असून, जीव मुठीत घेऊन विद्यार्थी वर्गांमध्ये बसत आहेत. त्यामुळे एखादी दुर्घटना घडल्यास प्रशासन याची जबाबदारी घेणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
बेळगाव शैक्षणिक जिल्हय़ातील 457 तर चिकोडी शैक्षणिक जिल्हय़ातील 959 वर्गखोल्या धोकादायक स्थितीत आहेत. काही शाळांचे छप्पर कमकुवत झाले आहे तर काही शाळांच्या भिंती जीर्ण झाल्या असून, त्या पेंव्हा कोसळतील याची शाश्वती नाही.
विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात
शहरी भागापेक्षा ग्रामीण भागातील शाळांची अवस्था भयावह असून, शाळांची वेळीच दुरुस्ती होणे आवश्यक आहे. शाळा व्यवस्थापन करणे हे जिल्हा प्रशासनाचे काम असून, त्यांच्याकडून दुर्लक्ष होत असल्यामुळेच विद्यार्थ्यांचा जीव धोक्मयात टाकला जात आहे.
अनेक शाळा धोकादायक स्थितीत
बेळगाव शहरातील मारुती गल्ली येथील शाळेची भिंत व छप्पर पावसामुळे कोसळले. तसेच खानापूर तालुक्मयातील गर्लगुंजी, मुडेवाडी, भांबार्डा व शिंगीनकोप्प या शाळांच्या भिंती कोसळल्याने विद्यार्थ्यांना इतरत्र बसविले जात आहे. याबरोबरच इतर अनेक शाळा पावसामुळे पेंव्हा कोसळतील याची शाश्वती नाही. बऱयाच शाळा तात्पुरत्या स्वरूपात इतर इमारतींमध्ये भरविल्या जात आहेत.
मंजूर निधी न मिळाल्याने शाळा दुरुस्त करणे होतेय अवघड
जिल्हय़ातील शाळांच्या दुरुस्तीसाठी यावर्षी 18 कोटी 53 लाखांचा निधी जि. पं. चे सीईओ एच. व्ही. दर्शन यांनी 19 मे रोजी जाहीर केला होता. स्मार्ट वर्गखोल्या, वर्गखोल्यांचे बांधकाम, दुरुस्ती, पाणीपुरवठा, शौचालय व इतर सुविधा पुरविण्यासाठी हा निधी दिला जाणार होता. परंतु अद्याप धोकादायक शाळांना हा निधी पोहोचलेला नसल्याने शाळांची पडझड सुरूच आहे. त्यामुळे शिक्षण विभागाने धोकादायक वर्गखोल्यांमध्ये वर्ग भरवू नये असे आदेश काढले आहेत. या धोकादायक वर्ग खोल्यांची वेळीच दुरुस्ती करणे गरजेचे आहे.
मोडकळीस आलेल्या वर्गखोल्या
| तालुका | वर्ग खोल्यांची संख्या |
| बेळगाव शहर | 51 |
| बेळगाव ग्रामीण | 18 |
| खानापूर | 65 |









