मुंबई :
गोदरेज इंटिरीओ या आघाडीवरच्या फर्निचर आणि इंटिरीअर सोल्युशन ब्रँडला उत्तर भारतातून आर्थिक वर्ष 2026 पर्यंत 450 कोटी रुपयांचा महसूल मिळण्याची शक्यता सांगितली जात आहे. कंपनी आगामी काळात आपला बाजारातील वाटा दुप्पट करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करते आहे. दिल्ली-एनसीआर या उत्तर भारतातील भागात मोठी बाजारपेठ कंपनीने काबीज केली असून पुढील 3 वर्षात याच भागात विस्ताराची योजना आहे. गोदरेज समूहातील ही सहकारी कंपनी आहे.









