रत्नागिरी :
गेल्या दोन वर्षांत परिवहन विभागाच्या 45 फेसलेस सेवा सुरू करण्यात आल्या आहेत. नुकताच राज्य शासनाने मेटासोबत व्हॉट्सअॅप गव्हर्नन्ससाठी करार केला आहे. यामुळे विविध विभागांच्या 500 अधिसूचित सेवा व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहेत. आता यामध्ये परिवहन विभागाच्या 45 सेवांचादेखील समावेश करण्याचा प्रयत्न करणार आहोत, अशी माहिती परिवहन विभागाच्या अधिकृत सूत्रांनी दिली.








