नवी दिल्ली
निस्सान मोटर इंडियाची एकूण घाऊक कार विक्री ऑक्टोबर 2022 मध्ये 45 टक्क्यांनी वाढून 10,011 युनिट झाली असल्याची माहिती कंपनीने मंगळवारी दिली आहे. निस्सान मोटर इंडियाने एका निवेदनात म्हटले आहे की, गेल्या महिन्यात कंपनीने देशांतर्गत बाजारात 3,061 युनिट्सची विक्री केली आणि 6,950 युनिट्सची निर्यात केली असल्याचेही सांगितले आहे. निस्सान मोटर इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक राकेश श्रीवास्तव म्हणाले, ‘सणाच्या काळात पुरवठय़ात वाढ झाली आहे. यावेळी, जलद वाहन वितरण आणि सोयीस्कर वित्तपुरवठा यामुळे ग्राहकांनीही खरेदीला पसंती दर्शवली होती.









