न्हावेली / वार्ताहर
45 lakhs sanctioned for Sonurli Mauli temple road
सावंतवाडी तालुक्यातील सोनुर्ली गावच्या ग्रामस्थांच्या मागणीनुसार सोनुर्ली माऊली मंदिर रस्ता डांबरीकरणाचे नुतणीकरणासाठी ४५ लाख रुपयांचा निधी शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांच्या प्रयत्नाने मंजूर झाला आहे . दरम्यान सदर रस्त्याच्या डांबरीकरणाचा शुभारंभ गावचे प्रमुख मानकरी राजू गावंकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला .यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख अशोक दळवी, शिवसेना तालुका प्रमुख नारायण उर्फ बबन राणे , सोनुर्ली सरपंच नारायण हिराप, गजानन नाटेकर, ग्रामस्थ शंकर गावंकर, संजय गावंकर , बाळकृष्ण गावकर गुरुनाथ म्हापसेकर , मारुती म्हापसेकर, आदी ग्रामस्थ मोठ्यासंख्येने उपस्थित होते. सोनुर्ली माऊली मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याच्या डांबरीकरणाला निधी उपलब्ध करुन दिल्याबद्दल सोनुर्ली ग्रामस्थांनी शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांचे आभार व्यक्त केले आहेत .









