वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
नॅशनल टेस्टिंग एजन्सीने शनिवारी जेईई (मुख्य) 2023 चे अंतिम गुण घोषित केले. यामध्ये 43 विद्यार्थ्यांनी 300 पैकी 300 म्हणजेच ‘परफेक्ट 100’ टक्के गुण मिळवत ऑल इंडिया रँक मिळवला आहे. ‘एनटीए’ने शनिवारी अंतिम निकाल आणि टॉपर्सची यादी प्रसिद्ध केली आहे. टॉपर्सची यादी अधिकृत वेबसाईट रास्aग्ह.हू.हग्म्.ग्ह वर अपलोड करण्यात आली आहे. टॉपर्सच्या यादीमध्ये विद्यार्थ्यांची नावानुसार यादी आहे. पहिल्या दहा जणांमध्ये तेलंगणा, आंध्रप्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि गुजरातमधील उमेदवारांचा समावेश आहे.









