चालू आर्थिक वर्षासाठीचा अंदाज
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
चालू आर्थिक वर्षाच्या दरम्यान भारताची मोबाईल निर्यात ही 43,500 कोटी रुपयांच्या घरात पोहोचणार असल्याची माहिती आहे. ही निर्यात सरकारच्या उत्पादन आधारीत सवलतीच्या योजनेमुळे शक्य होणार असल्याचे इंडिया सेल्यूलर ऍण्ड इलेक्ट्रॉनिक्स असोसिएशन (आयसीईए)यांनी म्हटले आहे.
भारताची मोबाईल फोन निर्यात चालू आर्थिक वर्षात आतापर्यंत जवळपास 75 टक्क्यांनी वाढून 42000 कोटी रुपयांच्या घरात पोहोचणार असल्याचेही आयसीइए यांनी स्पष्ट केले आहे. आर्थिक वर्षात 2020-21 च्या अंतिम टप्प्यात 24,000 कोटी रुपयांच्या फोन्सची निर्यात करण्यात आली होती. चालू आर्थिक वर्षात मोबाईल फोनची निर्यात सहजपणे 5.7 अब्ज डॉलरवर पोहोचणार असल्याचा विश्वास आयसीइएने व्यक्त केलाय.
ऍपल, सॅमसंगची सर्वाधिक निर्यात
आयसीइएनुसार भारतामधून ऍपल व सॅमसंगच्या मोबाईल फोनची सर्वाधिक निर्यात करण्यात आली आहे. देशातील उत्पादीत फोन्सची निर्यात इतर देशात केली जात असून उल्लेखनीय कार्य यायोगे केले जात आहे.









