नवी दिल्ली :
आयटी क्षेत्रातील देशातील मोठी कंपनी एचसीएल टेक्नॉलॉजीने आर्थिक वर्ष 2024-25 च्या पहिल्या तिमाहीतील निकालाची घोषणा केली आहे. कंपनीने सदरच्या तिमाहीत 20 टक्के वाढीव नफा नोंदवला असून तो जून 2024 च्या तिमाहीत 4357 कोटी रुपये इतका नोंदला गेला आहे. एक वर्षापूर्वी समान अवधीत कंपनीने 3534 कोटी रुपयांचा नफा प्राप्त केला होता.
कंपनीने सदरच्या तिमाहीत वर्षाच्या आधारावर पाहता 7 टक्के महसुलात वाढ नेंदवली आहे. जूनच्या तिमाहीत 28,057 कोटी रुपयांचा महसूल कंपनीने प्राप्त केला आहे. डिसेंबरच्या तिमाहीतील नफ्यापेक्षा मागच्या तिमाहीतला नफा हा कंपनीने 7 टक्के अधिक कमावला आहे. महसुलाचा विचार केल्यास तिमाही आधारावर पाहिल्यास 1.5 टक्के घसरण दिसली आहे.
काय म्हणाले सीईओ
कंपनीचे सीईओ आणि व्यवस्थापकीय संचालक सी. विजयकुमार म्हणाले की, आम्ही स्थिर चलन दराच्या माध्यमातून वर्षाच्या आधारावर महसुलात 6 टक्के इतकी वाढ प्राप्त केली असून कंपनीच्या कामाचे निश्चितच समाधान वाटते. आगामी काळातही उत्तम प्रदर्शन करण्याच्या दिशेने कंपनीची वाटचाल असेल.









