वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
‘गो फर्स्ट’ने एअरलाइनचे कामकाज पुन्हा सुरू करण्यास मदत करण्यासाठी एअरलाईन्स फायनान्सर्सकडे अंतरिम वित्त म्हणून 425 कोटी रुपयांची मागणी केली आहे. संकटात सापडलेल्या विमान कंपनीच्या कमिटी ऑफ व्रेडिटर्सने हा निर्णय घेतला आहे. भविष्यात विमानासाठी फिट इंजिनची उपलब्धता आणि तिकीट रद्द करण्यासारख्या काही आकस्मिकता निधीसाठी आणखी काही रकमेची गरज भासू शकतले असेही सूत्राचे म्हणणे आहे. या आठवड्याच्या सुऊवातीला झालेल्या बैठकीत कर्जदारांच्या समितीसमोर वित्तपुरवठ्याशी संबंधित हा प्रस्ताव ठेवण्यात आल्याचे वृत्त आहे. कर्जदारांच्या समितीमध्ये सेंट्रल बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा, आयडीबीआय बँक आणि ड्यूश बँक यांचा समावेश आहे. मात्र, या वित्तीय संस्थांनी अद्याप या प्रकरणावर अधिकृतपणे भाष्य केलेले नाही.









