विनोद सावंत, कोल्हापूर
Shahu Mill Kolhapur News : शाहू मिल येथे राजर्षी शाहू महाराज यांचे आंतराराष्ट्रीय दर्जाचे स्मारक उभारण्याचे काम तीन महिन्यांत सुरू करणार असल्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले आहे. महापालिकेकडून स्मारकासाठी आराखडा तयार केला आहे. यानुसार शाहू मिलच्या 27 एकरमध्ये आंतराराष्ट्रीय दर्जाचे स्मारक उभारण्यासाठी 410 कोटींचा निधी लागणार आहे.
राज्यात 2014 मध्ये आघाडी सरकार सत्तेवर असताना प्रथम शाहू मिल येथे शाहू स्मारक उभारण्यासाठी आराखडा तयार केला होता. परंतू काही कारणात्सव आराखड्याला मंजुरी मिळाली नाही. राजर्षी शाहू महाराज यांच्या स्मृती शताब्दी वर्षानिमित्त शाहू स्मारकाचा विषय पुन्हा चर्चेत आला. महाविकास आघाडी सत्तेवर असताना शाहू स्मारकाचा आरखडा करण्यासाठी समिती नेमली गेली. या समितीने राष्ट्रीय स्तरावर स्पर्धा घेतली. यात पुण्यातील शारंग जोशी आणि श्रीकांत अनवट यांचा आराखडा निश्चित केला. या आरखड्याचे 6 मे 2022 रोजी राजर्षी शाहू महाराज यांच्या स्मृती शताब्दी वर्षाच्या कार्यक्रमाप्रसंगी शाहू मिलमध्ये सादरीकरण झाले. यावेळी महाविकास आघाडी सरकारने स्मारकासाठी निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही दिली होती. दरम्यान, राज्यात सत्तांतर शिंदे-फडणवीस सरकार सत्तेवर आले. शाहू समाधी शताब्दी वर्षाची सांगता कार्यक्रमानिमित्त स्मारकाचा विषय पुन्हा चर्चेत आला. पालकमंत्री दीपक केसरकर यांनी 6 मे 2023 रोजी शाहू मिलमध्ये तीन महिन्यांत स्मारकाचे काम सुरू केले जाईल, असे जाहीर केले आहे. यामुळे शाहू मिलमध्ये शाहू स्मारक होण्याचा आशा पल्लवीत झाल्या आहेत.
स्मारकासाठी मनपाला 27 एकरची जागा मिळणे आवश्यक
राजर्षी शाहू महाराजांचा विचार, कार्य यांची माहिती सर्वांसमोर येईल. तसेच कोल्हापुरात येणारा प्रत्येक पर्यटक शाहू स्मारक येथे अवर्जुन भेट देईल, अशा दर्जाचे मनपाने आराखडा तयार केला आहे. पंरतू यासाठी प्रथम शाहू मिलची 27 एकर जागा महापालिकेकडे विनामुल्य हस्तांतरीत होणे आवश्यक आहे.
वर्ष सरले, 10 कोटी वाढले
स्मारकाचा विषय 2014 पासून सुरू आहे. प्रत्येक सरकार नुसतीच घोषणा करते. प्रत्यक्षात कार्यवाही होताना दिसून येत नाही. मागील वर्षी 6 मे 2022 रोजी स्मारकाचा 400 कोटींचा आराखडा सादरीकरण केला हेता. वर्षभर काहीच निर्णय झाला नाही. आता चालु डिएसआरनुसार 410 कोटींचा आराखडा झाला आहे. वर्षात 10 कोटींची वाढ झाली आहे. त्यामुळे नुसतची घोषणा नको तर अंमलबजावणी होणे आवश्यक आहे.
शाहू स्मारकाच्या आराखड्याचे मागील महिन्यांत मुंबईमध्ये पालकमंत्री दीपक केसरकर यांच्यासमोर सादरीकरण झाले आहे. स्मारकाबाबत ते सकारात्मक असून कोल्हापुरात येणाऱ्या प्रत्येक पर्यटकांनी पहावे, असे स्मारक उभारण्याचा त्यांचा मानस आहे. त्यामुळे लवकरच राज्यशासनाकडून आराखड्यास अंतिम मंजूरी मिळून मनपाकडे निधी मिळेल, अशी अपेक्षा आहे.
हर्षजित घाटगे, शहर अभियंता, महापालिका
मनपाच्या आराखड्यानुसार नियोजित स्मारक
तीन प्रवेशद्वार
एज्युकेशनल हब
राजर्षी शाहू महाराज यांचा 51 फुटी पुर्णाकृती पुतळा
1200 सीटांची क्षमता असणारे खुले नाट्यागृह
मध्यवर्ती इमारत, कलादालन
विद्यमान गिरणी संरचनेचे संवर्धन आणि कला, सांस्कृतिक केंद्र म्हणून त्याचा पुनरवापर करणे.
संगीत, नाटक सुविधा, ग्रंथालय, फिल्म आर्काईव्हची सुविधा.
कोटीतीर्थ तलाव विकसित करून लाईट आणि साऊंड शो, पादचारी मार्ग, खाऊ गल्ली उभारणे.
सार्वजणिक वाहतूक सुविधेला प्रोत्साहन देण्यासाठी सुनियोजित ट्रान्झिट हब
1200 क्षमतेचे सुसज्ज सभागृह
7100 सीटच्या क्षमतेचे दृकश्राव्य थिएटर
2500 दुचाकी, 500 कार क्षमतेचे भूमिगत पार्कींग
शाहू महाराजांच्या जीवनातील संस्मरणीय क्षणांवर भर देणारी थीम आधरित लँडस्केप डिझाईन.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









