वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतात 13 ते 19 जानेवारी दरम्यान होणाऱ्या पहिल्या विश्वचषक खो-खो स्पर्धेत एकूण 41 संघांचा समावेश राहिल. यामध्ये प्रामुख्याने अमेरिका, इंग्लंड, जर्मनी, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि ब्राझील यांचा समवेश आहे.
पहिल्यादांच आयोजित केलेल्या विश्व चषक खो-खो स्पर्धेतील यजमानपद भारताला मिळाले आहे. ही स्पर्धा आठवडाभर चालणार आहे. आतापर्यंत 24 देशांनी आपला सहभाग निश्चित दर्शविला आहे. ही स्पर्धा दिल्लीतील इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियममध्ये तसेच नोयडाच्या इनडोअर स्टेडियममध्ये खेळविली जाणार आहे. ही स्पर्धा साखळीबाद पद्धतीने होणार असल्याची माहिती अखिल भारतीय खो-खो फेडरेशनच्या अध्यक्ष सुधांशु मित्तल यांनी दिली आहे. ही स्पर्धा पुरुष आणि महिला अशा दोन विभागात खेळविली जाणार आहे. आशिया खंडातील देशांचा या स्पर्धेत समावेश असून इंडोनेशिया फक्त आपला महिलांचा संघ पाठविणार आहे. तर इतर देश पुरुष आणि महिलांचे स्वतंत्र संघ पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. प्रत्येक संघामध्ये 15 खेळाडू, एक प्रशिक्षक, एक व्यवस्थापक, तांत्रिक बाबी हाताळणाऱ्या व्यक्तीचा समावेश राहिल.









