2050 पर्यंत गंभीर होणार स्थिती
पृथ्वीवरील आर्द्रता आणि हवामान संतुलनातील सर्वात महत्त्वाचा दुवा वेटलँड्स आता इतिहास ठरण्याच्या स्थितीत पोहोचले आहेत. ग्लोबल वेटलँड आउटलुकच्या नव्या अहवालात गंभीर इशारा देण्यात आला आहे. मागील 50 वर्षांमध्ये पृथ्वीने 41.2 कोटी हेक्टर वेटलँड गमाविले असून हे प्रमाण भारताच्या एकूण क्षेत्रफळापेक्षाही अधिक आहे. हा विनाश आजही दरवर्षी 0.52 टक्क्यांच्या दराने जारी आहे.

संयुक्त राष्ट्रसंघ समर्थित ग्लोबल वेटलँड आउटलुकला कन्व्हेंशन ऑन वेटलँड्सचे वैज्ञानिक आणि तांत्रिक पॅनेलने तयार केले आहे. 1970 पासून आतापर्यंत जगाने 22 टक्के वेटलँड्स गमाविले आहेत. यात पीटलँड्स, नद्या, सरोवरे, कांदळवने आणि दलदलयुक्त क्षेत्र सामील आहे. आर्थिक दृष्टीकोनातून ही हानी 5.1 ट्रिलियन डॉलर्सपेक्षा अधिक असल्याचे मानले जात आहे.
वर्तमानात जगातील एक चतुर्थांश वेटलँड्स गंभीर स्वरुपात हानिग्रस्त आहेत. अनियोजित शहरीकरण, प्रदूषण, शेतीचा विस्तार, हवामान बदल यासारखे घटक स्थितीला आणखी जटिल करत आहेत. हाच प्रकार सुरू राहिल्यास 2050 पर्यंत आम्ही या वेटलँड्सकडून प्राप्त होणारे 39 ट्रिलियन डॉलर्सचे पारिस्थितिक लाभ गमावून बसू असे अहवालात म्हटले गेले.
जीवनाच्या गुणवत्तेच्या स्तरावर नुकसान
स्थिती अशीच राहिल्यास नुकसान केवळ आर्थिक नव्हे तर जैवविविधता, हवामान सुरक्षा आणि जीवनाच्या गुणवत्तेच्या स्तरावर होईल. वेटलँड्स हवामान बदलाच्या विरोधात रक्षात्मक ढाल आहेत. कांदळवने, सॉल्ट मार्श आणि सागरी गवत किनारी भागांना वादळांपासून वाचवितात, तर पीटलँड्स कार्बन स्टोर करण्यात सर्वात पुढे आहेत. उष्णकटिबंधीय वेटलँड्स दरवर्षी 4620 लोकांचा जीव वाचवितात आणि 33.6 लाख कोटीच्या संभाव्य आर्थिक नुकसानाला टाळतात. भारतात हेच वेटलँड्स दरवर्षी 414 लोकांचे जीवन अन् 65,339 कोटी रुपये वाचवत आहेत.









