अयोध्या राममंदिरासाठी अलिगडमधील भक्ताकडून निर्मिती
वृत्तसंस्था/ अयोध्या, अलिगड
अयोध्येत रामजन्मभूमी मंदिराच्या उभारणीचे काम जोरात सुरू आहे. जानेवारी 2024 मध्ये मंदिर भाविकांसाठी खुले होण्याची अपेक्षा आहे. सध्या पहिल्या मजल्यावरील मंदिर संकुलाचे बहुतेक काम पूर्णत्वास येत असतानाच मंदिरासाठी वापरण्यात येणाऱ्या वस्तूंविषयी नवनव्या आणि चकीत करणाऱ्या कानगोष्टी उलगडत आहेत. त्यातीलच आणखी एक थक्क करणारी गोष्ट म्हणजे ‘400 किलोचे कुलूप आणि 4 फुटाची चावी’!

अयोध्येतील राम मंदिरासाठी अलिगडमधील एका वृद्ध कारागिराने 400 किलो वजनाचे कुलूप तयार केले आहे. हाताने बनवलेल्या कुलूपांसाठी प्रसिद्ध असलेले राम भक्त सत्यप्रकाश शर्मा यांनी ‘जगातील सर्वात मोठे हाताने बनवलेले कुलूप’ बनवण्यासाठी अनेक महिने अथक परिश्र्रम घेतले. हे मोठे कुलूप 10 फूट उंच, 4.5 फूट ऊंद आणि 9.5 इंच जाड असून ते 4 फूट लांब किल्लीने उघडते. हे कुलूप तयार करण्यासाठी सत्यप्रकाश शर्मा यांनी आपल्या आयुष्यातील बचतीचा वापर केला असून त्यासाठी सुमारे 2 लाख ऊपये खर्च आला आहे. या वर्षाच्या सुऊवातीला अलिगडच्या वार्षिक प्रदर्शनात हे कुलूप प्रदर्शित करण्यात आले होते. शर्मा सध्या त्या कुलुपामध्ये आणखी काही सुधारणा करून त्याला पूर्ण अंतिम स्वरूप देण्यात गुंतले आहेत. शर्मा यांचा परिवार 45 वर्षांहून अधिक काळ हाताने तयार केलेले कुलूप बनवण्याचा व्यवसाय करतात.
पती-पत्नीकडून कारागिरी
“मी अनेक दशकांपासून कुलूप बनवण्याचा व्यवसाय करत असल्याने मी मंदिरासाठी मोठे कुलूप बनवण्याचा विचार केला आहे. कारण आमचे शहर कुलुपांसाठी ओळखले जाते आणि यापूर्वी कोणीही असे काही केले नाही.” माझ्यासाठी हे ‘प्रेमाचे श्र्रम’ असल्याचे सत्यप्रकाश शर्मा यांनी सांगितले. कुलूप निर्मितीच्या कामात आपल्याला पत्नी ऊक्मिणी हिनेही मदत केल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सत्यप्रकाश शर्मा या वर्षाच्या अखेरीस राम मंदिर अधिकाऱ्यांना अनोखे कुलूप भेट देण्याची योजना आखत आहेत. अयोध्येतील राम मंदिरात हे कुलूप कुठे वापरले जाणार यावर अद्याप निर्णय झाला नसला तरी मंदिर व्यवस्थापनाकडून त्याचा स्वीकार केला जाणार आहे. लॉक कुठे वापरता येईल हे पाहावे लागेल, असे रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. अयोध्येतील राम मंदिराचा अभिषेक सोहळा पुढील वषी 21, 22 आणि 23 जानेवारी रोजी होणार असल्याचे राम मंदिर ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी सांगितले.









