वृत्तसंस्था/ बेंगळूर
हॉकी इंडियाने याआधी शिबिरासाठी निवडलेल्या 65 हॉकीपटूंच्या संख्येत कपात करून 40 जणींची शिबिरासाठी निवड केली आहे. गेल्या दोन आठवड्यातील खेळाडूंच्या कामगिरीचा आढावा घेऊन ही कपात करण्यात आली आहे.
23 मार्च रोजी बेंगळूरमधील साई केंद्रात शिबीर सुरू झाले आहे. 28 वरिष्ठ महिलांना कायम ठेवण्यात आले असून 12 नव्या चेहऱ्यांची निवड करण्यात आली आहे. 15 व्या वरिष्ठ महिलांच्या राष्ट्रीय चॅम्पियनशिप व राष्ट्रीय शिबिराच्या पहिल्या टप्प्यात केलेल्या कामगिरीच्या आधारावर ही निवड झाली आहे. गोलरक्षक विभागात नेहमीच्या सविता, बिच्छू देवी खारिबम, बन्सरी सोळंकी, माधुरी किंडा या चार जणींचा समावेश आहे. आसामच्या समीक्षा सक्सेनाची त्यात भर घालण्यात आली आहे. राष्ट्रीय चॅम्पियनशिपमधील कामगिरीचे तिला हे बक्षीस मिळाले आहे.
भारताने निवडलेला 40 जणींचा महिला संघ : गोलरक्षक-सविता, बिच्छू देवी खारिबम, बन्सरी सोळंकी, माधुरी किंडो व समीक्षा सक्सेना. बचावपटू-महिमा चौधरी, निक्की प्रधान्। सुशीला चानू, उदिता, इशिका चौधरी, ज्योती छात्री, ज्योती, अक्षता आबासो ढेकळे, अंजना डुंगडुंग, सुमन देवी थौडम. मध्यफळी-सुजाता कुजुर, वैष्णवी विठ्ठल फाळके, नेहा, सलिमा टेटे, मनीषा चौहान, अजमिना कुजुर, सुनेलिता टोपो, लालरेमसियामी, शर्मिला देवी, बलजीत कौर, महिमा टेटे, अलबेला राणी टोपो, पूजा यादव. आघाडी फळी-दिपिमोनिका टोपो, हृतिका सिंग, दीपिका सोरेंग, नवनीत कौर, संगीता कुमारी, दीपिका, रुतुजा दादासो पिसाळ, ब्युटी डुंगडुंग, मुमताझ खान, अन्नू, चंदना जगदीश, काजल सदाशिव आटपाडकर,.









