शेतकऱ्यांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला
खानापूर : चापगाव येथे विद्युतभारित तार तुटून उसात पडल्याने उसाला आग लागून सुमारे 40 टन ऊस जळून खाक झाल्याची घटना शनिवारी दुपारी चापगाव येथील शिवारात घडली. येथील शेतकरी विनाजी पाटील यांच्या शेतात ही आग लागली आहे. यावेळी शेजारील शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांच्या खबरदारीमुळे मोठा अनर्थ टळला आहे. मोठे खांब उभारून विद्युतपुरवठा केला जातो. शनिवारी दुपारी चापगाव येथील शिवारात एका ट्रान्स्फॉर्मरजवळ शॉर्टसर्किट होऊन विद्युतभारित तार तुटून उसात पडली. त्यामुळे आग लागून एकरातील ऊस जळून खाक झाला. यावेळी शेजारील शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांनी खबरदारी घेत याबाबतची माहिती हेस्कॉमच्या कर्मचाऱ्याना दिली आणि तातडीने विद्युतपुरवठा बंद करण्यात आला. त्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे. या परिसरात आजुबाजूला संपूर्ण ऊस पीक आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी खबरदारी घेत आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केला. त्यामुळे शेजारील उसाला आगीपासून रोखण्यात शेतकऱ्यांना यश आले. यावेळी उदय पाटील, गजानन पाटील, कृष्णा पाटील, किरण पाटील, विष्णू पाटील, हणमंत बेळगावकर, अनिल बेळगावकर, जयराम पाटील, बाळू जिवाई, गजानन बेळगावकर, नारायण बेळगावकर या शेतकऱ्यांच्या प्रयत्नामुळे मोठा अनर्थ टळला.









