वार्ताहर/विजापूर
तालुक्यातील कराड दोडक्रॉस जवळ अबकारी विभागाने धाड घालून वासू शिवाजी घाटगे रा. शिवाजी सर्कल जवळ विजापूर यास अटक करून त्याच्याकडून 1.28 लाखाची शिंदी जप्त केली. ऑटोमधून 40 लिटर शिंदी अनधिकृतपणे विक्री करण्याच्या उद्देशाने वाहतूक करताना त्याला ताब्यात घेतले. अबकारी खात्याचे अप्पर आयुक्त डॉ. वाय मंजुनाथ, अबकारी अप्पर आयुक्त एफ. एच. चलवादी, अबकारी उपआयुक्त मुरलीधर, उप निरीक्षक एस. एन. हिरेमठ यांच्या मार्गदर्शनाखाली महादेव पुजारी यांनी ही कारवाई केली.









