वार्ताहर /कामुर्ली
कामुर्ली पंचायत सभागृहात रविवार दि. 18 रोजी कामुर्ली ग्रामपंचायत व मणिपाल हॉस्पिटल, दोनापावला यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. मणिपाल हॉस्पिटलचे डॉक्टर पथक सर्व यंत्रणा सहित पंचायत सभागृहात उपस्थित होते. या रक्तदान शिबिरात 40 रक्तदात्यानी रक्तदान केले. यावेळी सरपंचा छाया शरद गाड यांनीही रक्तदान केले.
शिबिराचे उद्घाटन थिवीचे आमदार, मच्छिमार तसेच पशुसंवर्धन मंत्री नीळकंठ हळर्णकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलीन करून करण्यात आले. यावेळी सरपंच छाया शरद गाड, मणिपाल हॉस्पिटलचे डॉक्टर, तसेच पंचायत सदस्य, माजी सरपंच शरद गाड व गावातील अन्य मान्यवर उपस्थित होते. यावेळी मंत्र्यांनी रक्तदात्याना शुभेच्छा दिल्या.









