नवी दिल्ली : आर्थिक वर्ष 2019-20 मधील चार जानेवारीपर्यंत पाच कोटीपेक्षा अधिकचा प्राप्तिकर परतावा (आयटीआर) दाखल करण्यात आला आहे. सरकारी लोकांसाठी प्राप्तिकर परतावा सादर करण्याची अंतिम मुदत वाढवून 10 जानेवारी आणि कंपन्यांसाठी 15 फेब्रुवारी निश्चित केली आहे. प्राप्तिकर विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार वर्ष 2020-21 साठी 5.01 कोटीपेक्षा अधिकचा प्राप्तिकर परतावा 4 जानेवारी 2021 पर्यंत जमा झाला आहे.
विश्लेषकांच्या माहितीनुसार 2019-20 साठी व्यक्तिगत पातळीवर प्राप्तिकर परतावा भरण्याची गती ही काही प्रमाणात मंदावली आहे. जी कंपन्यांच्या तसेच ट्रस्टच्याबाबतीत वाढली आहे.









