पहिले उड्डाण 21 ऑक्टोबर रोजी : पुढील वर्षाच्या प्रारंभी मानवरहित मोहीम रवाना होणार
वृत्तसंस्था/ मदुराई
इस्रो 21 ऑक्टोबर रोजी गगनयान मोहिमेची पहिली टेस्ट फ्लाइट प्रक्षेsपित करणार आहे. यानंतर आणखी तीन टेस्ट फ्लाइट पाठविल्या जाणार असल्याची माहिती इस्रोचे अध्यक्ष एस. सोमनाथ यांनी दिली आहे. 21 ऑक्टोबर रोजी पहिली टेस्ट व्हीकल डेव्हलपमेंट फ्लाइट (टीव्ही-डी1) नंतर आम्ही डी2, डी3 आणि डी4 चे प्लॅनिंग केले असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
या टेस्टमध्ये क्रू मॉड्यूलला आउटर स्पेसमध्ये प्रक्षेपित करणे, पृथ्वीवर परत आणणे आणि बंगालच्या उपसागरात टचडाउननंतर त्याला रिकव्हर करणे सामील आहे. क्रू मॉड्यूल गगनयान मोहिमेदरम्यान अंतराळवीरांना आउटर स्पेसमध्ये नेणार आहे. गगनयान मोहिमेच्या अंतर्गत इस्रोने पुढीलवर्षाच्या प्रारंभी पहिली मानवरहित मोहीम निश्चित केली आहे. मानवरहित मोहीम यशस्वी ठरल्यावर मानवयुक्त मोहीम साकारण्यात येणार आहे. यानुसार अंतराळात माणूस पाठविला जाणार आहे.
पॅराशूटचे परीक्षण
यापूर्वी इस्रोने गगनयान मोहिमेसाठी ड्रॅग पॅराशूटचे यशस्वी परीक्षण 8-10 ऑगस्टदरम्यान चंदीगडमध्ये केले होते. हा पॅराशूट अंतराळवीरांना सुरक्षित लँडिंगमध्ये मदत करणार आहे. तसेच व्रू मॉड्यूचा वेग कमी करत त्याला स्थिर देखील ठेवणार आहे. याकरता अंतराळवीरांच्या लँडिंगसारखी स्थिती परीक्षणादरम्यान निर्माण करण्यात आली होती. तसेच भारताच्या या भावी अंतराळवीरांना रशियात देखील प्रशिक्षण मिळाले आहे. कोरोना महामारीच्या काळात भारतीय अंतराळवीर रशियात विशेष प्रशिक्षण घेत होते. या मोहिमेकरता रशियाकडून भारताला सहकार्य मिळत आहे.
3 दिवसांनी परतणार अंतराळवीर
गगनयानमध्ये 3 दिवसांच्या मोहिमेसाठी 3 सदस्यांच्या पथकाला 400 किलोमीटर उंचीवरील पृथ्वीच्या कक्षेत पाठविले जाणार आहे. यानंतर क्रू मॉड्यूलला सुरक्षितपणे समुद्रात लँड करविण्यात येणार आहे. भारत या मोहिमेत यशस्वी ठरला तर अशाप्रकारची कामगिरी करणारा चौथा देश ठरणार आहे. यापूर्वी अमेरिका, चीन आणि रशियाने अशी कामगिरी करून दाखविली आहे.
पंतप्रधान मोदींकडून 2018 मध्ये घोषणा
2018 साली स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गगनयान मोहिमेची घोषणा केली होती. 2022 पर्यंत ही मोहीम पूर्ण करण्याचे लक्ष्य निर्धारित करण्यात आले होते, परंतु कोरोना महामारीमुळे या मोहिमेला विलंब झाला आहे. आता 2024 च्या अखेरीस किंवा 2025 च्या प्रारंभी ही मोहीम साकार होण्याची शक्यता आहे.
अंतराळवीरांना प्रशिक्षण
इस्रो या मोहिमेसाठी 4 अंतराळवीरांना प्रशिक्षण देत आहे. बेंगळूर येथील एस्ट्रोनॉट ट्रेनिंग फॅसिलिटीमध्ये क्लासरुम ट्रेनिंग, फिजिकल फिटनेस ट्रेनिंग, सिम्युलेटर ट्रेनिंग आणि् ाफ्लाइट सूट ट्रेनिंग देण्यात येत आहे. मानवयुक्त माहिमांसाठी पथकाचा विस्तार करण्याची योजना देखील इस्रो तयार करत आहे. गगनयान मोहिमेसाठी सरकारकडून मोठा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.









