विश्वचषक पात्रता फेरीत वाढली चुरस : यजमान झिम्बाब्वे, श्रीलंकेची शानदार कामगिरी
वृत्तसंस्था /हरारे
झिम्बाब्वेमध्ये सध्या 2023 एकदिवसीय विश्वचषकाचे पात्रता सामने खेळले जात आहेत. यामध्ये 10 संघांनी भाग घेतला होता, मात्र आता 4 संघ पात्रता फेरीतून बाहेर पडले आहेत. आयर्लंड, नेपाळ, यूएई आणि अमेरिकेचे वनडे विश्वचषक खेळण्याचे स्वप्न भंगले आहे. हे सर्व संघ पात्रता फेरीतून बाहेर पडले आहेत. आता भारतात खेळल्या जाणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकाच्या मुख्य स्पर्धेत पोहोचण्यासाठी 6 संघांमध्ये चुरस रंगणार आहे. 10 पैकी 4 संघ पात्रता फेरीतून बाहेर पडल्यानंतर आता 6 संघांनी सुपर-6 मध्ये स्थान मिळवले आहे. यामध्ये श्रीलंका, झिम्बाब्वे, नेदरलँड, स्कॉटलंड, ओमान आणि वेस्ट इंडिजचा समावेश आहे. लीग टप्प्यातील 4 सामने अद्याप बाकी आहेत. पण सुपर- 6 चे चित्र स्पष्ट झाले आहे.29 जूनपासून रंगणार सुपर-6 सामने वर्ल्डकप क्वालिफायर फेरीतल सुपर-6 चे सामने 29 जूनपासून रंगणार आहेत. तर या स्पर्धेचा अंतिम सामना 9 जुलै रोजी होणार आहे. पात्रता फेरीतील टॉप दोन संघ विश्वचषकाच्या मुख्य स्पर्धेत सहभागी होतील. दरम्यान, यंदा भारतात होणारा वनडे वर्ल्डकप 10 संघांमध्ये खेळवला जाणार आहे. यासाठी आठ संघ थेट पात्र ठरले आहेत. आणि अंतिम दोन संघ पात्रता फेरीतून पोहोचतील. यजमान भारत, पाकिस्तान, बांगलादेश, अफगाणिस्तान, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड 2023 च्या वनडे विश्वचषक स्पर्धेसाटी थेट पात्र ठरले आहेत. आता उर्वरित दोन संघ पात्रता फेरीतून मुख्य स्पर्धेत पोहोचतील. ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये वनडे वर्ल्डकप भारतात खेळवला जाणार असून लवकरच याच्या तारखा जाहीर होणार असल्याचे आयसीसीच्या सूत्रांनी सांगितले आहे.









