पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर चोरी : वाढत्या गुन्ह्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
प्रतिनिधी/रत्नागिरी
रत्नागिरी शहरात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून शनिवारी सकाळी ४ दुकाने फोडल्याचे समोर आले. यामध्ये रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या धनजीनाका येथील नागरवाला स्टोअर्सचाही समावेश आहे. शहर परिसरात वाढत्या गुन्हेगारी कृत्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
हे ही वाचा : रेल्वेपुढे स्वतला झोकून देत तरूणाची आत्महत्या
मुंबईतील व्यापाऱ्याच्या खूनामुळे हादरून गेलल्या रत्नागिरीमधील व्यापाऱ्यांना चोरट्यांच्या उपद्रवामुळे सलग दुसरा धक्का बसला. शनिवारी सकाळी दुकाने उघडण्यासाठी आलेल्यांना चोरट्यांनी दुकाने फोडल्याचे दिसले. यामध्ये शहरातील धमालनीचा पार येथील अनिरूद्ध ट्रेडर्स, आठवडा बाजार येथील यश ट्रेडर्स, यश डिस्ट्रिब्युटर व धनजीनाका येथील नागरवाला जनरल स्टोअर्सचा समावेश आहे.









