टीम इंडियाचे मायदेशातील वेळापत्रक जाहीर : ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये वेस्ट इंडिज,आफ्रिका भारत दौऱ्यावर
वृत्तसंस्था/मुंबई
बीसीसीआयने टीम इंडियाच्याच्या वेळापत्रकाची घोषणा केली असून, वर्षाच्या शेवटी वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिका हे दोन संघ भारत दौऱ्यावर येणार आहेत. ऑक्टोबर महिन्यात वेस्ट इंडिजचा संघ भारत दौऱ्यावर येणार असून यावेळी 2 सामन्यांची कसोटी मालिका खेळतील तर नोव्हेंबरमध्ये आफ्रिका भारत दौऱ्यावर येईल. दोन्ही संघांमध्ये दोन कसोटी, तीन एकदिवसीय आणि पाच टी-20 सामने खेळले जातील. विशेष म्हणजे, टीम इंडिया दोन्ही संघांविरुद्ध एकूण 4 मालिकांमध्ये 12 सामने खेळणार आहे. बीसीसीआयने सोशल मीडियावरुन प्रसिद्धीपत्रकाद्वारे याबाबतची माहिती दिली आहे. भारत-वेस्ट इंडिज कसोटी मालिकेतील पहिला सामना 2 ऑक्टोबरपासून अहमदाबाद येथे खेळला जाईल. तर दुसरा सामना 10 ऑक्टोबरपासून कोलकाता येथे सुरु होईल. यानंतर, दक्षिण आफ्रिकेसोबत कसोटी मालिका 14 नोव्हेंबरपासून सुरु होईल. यानंतर उभय संघात वनडे मालिका 30 नोव्हेंबरपासून तर टी-20 मालिका 9 डिसेंबरपासून सुरु होणार आहे.
वेस्ट इंडिजचा भारत दौरा
- पहिली कसोटी – 2 ऑक्टोबर ते 6 ऑक्टोबर, अहमदाबाद सकाळी 9:30 वा.
- दुसरी कसोटी – 10 ऑक्टोबर ते 14 ऑक्टोबर, कोलकाता सकाळी 9:30 वा.
द.आफ्रिकेचा भारत दौरा
- पहिली कसोटी 14 ते 18 नोव्हेंबर, नवी दिल्ली, सकाळी 9:30 वा.
- दुसरी कसोटी 22 ते 26 नोव्हेंबर, गुवाहाटी, सकाळी 9:30.
- पहिला एकदिवसीय सामना 30 नोव्हेंबर, रांची, दुपारी 1.30 वा
- दुसरा एकदिवसीय सामना 3 डिसेंबर, रायपूर दुपारी 1:30 वा
- तिसरा एकदिवसीय सामना 6 डिसेंबर, विशाखापट्टणम, दुपारी 1:30 वा
- पहिला टी-20 9 डिसेंबर, संध्या 7:00 वा, कटक
- दुसरा टी-20 11 डिसेंबर, संध्या 7:00 वा, चंदीगड
- तिसरा टी-20 14 डिसेंबर, संध्या 7:00 वा, धर्मशाला
- चौथा टी-20 17 डिसेंबर, संध्या 7:00 वा, लखनौ
- पाचवा टी-20 19 डिसेंबर, संध्या. 7:00 वा, अहमदाबाद.









