माडखोल केंद्रप्रमुख रामचंद्र वालावलकर यांची माहिती
ओटवणे प्रतिनिधी
निपुण भारत अंतर्गत माडखोल केंद्रातील चार शाळांनी गुणवत्तेची प्रमुख तीन ध्येय पूर्ण केलेली असल्याने या शाळा निपुण शाळा म्हणुन घोषित करण्यात येत आहे. जिल्ह्यात प्रथमच या चार शाळा निपुण शाळा म्हणून घोषित झाल्या असून आता माडखोल केंद्रातील सर्व प्राथमिक शाळा निपुण शाळा म्हणुन घोषित करण्यात येणार असल्याची माहिती माडखोल केंद्रप्रमुख रामचंद्र वालावलकर यांनी दिली.
निपुण शाळा घोषणेची १०० टक्के उद्दिष्ट यशप्राप्ती करणाऱ्या शाळांमध्ये कारिवडे- डंगवाडी, कारिवडे आपट्याचे गाळू, माडखोल धुरीवाडी, माडखोल बामणादेवी या शाळांचा समावेश आहे. या चारही निपुण शाळांना आयएसओ मानांकित शाळा माडखोल धवडकी शाळा नं २ चे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष उदय राऊत, शाळेच्या मुख्याध्यापिका भावना गावडे यांच्याहस्ते पुष्पगुच्छ देऊन सर्वांना सन्मानीत करणेत आले.
निपुण शाळा घोषणेची १०० टक्के उद्दिष्टे पूर्ण केल्यानंतर त्या शालननी याची घोषणा करावयाची आहे. या शाळेतील शिक्षक एक समन्वय आणि समाधानाची जाणीव यातून शैक्षणिक कार्य करतात त्यामुळे या निपुण शाळेचे सर्व श्रेय या शाळेतील शिक्षकांचे असुन त्यांना सावंतवाडी तालुका गटशिक्षणाधिकारी कल्पना बोडके यांचेही यासाठी मार्गदर्शन मिळत असल्याचे श्री वालावलकर यांनी सांगितले.यावेळी शुभदा वारंग (डंगवाडी), सतिश राऊळ (आपट्याचेगाळू), धुरीवाडी प्रशांत कांदे (धुरीवाडी), अमिषा कुंभार (बामणादेवी) या निपुण प्राथमिक शाळांचे मुख्याध्यापक उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक अरविंद सरनोबत यांनी केले.









