समोर आला धक्कादायक व्हिडिओ
अहमदाबाद :
गुजरातची राजधानी गांधीनगरमध्ये पुन्हा एकदा भरधाव वेगाचा कहर दिसून आला आहे. गांधीनगरच्या रांदेसणनजीक हिट अँड रनच्या मोठ्या घटनेत 4 जणांचा मृत्यू झाला आहे. तर या घटनेतील मृतांची संख्या वाढू शकते, अशी भीती गांधीनगरच्या महापौरांनी व्यक्त केली आहे. एका भरधाव कारने अनेक लोकांना टक्कर दिली. कारचालक नशेत होता, असे स्थानिक लोकांचे सांगणे आहे. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. कारची टक्कर अत्यंत तीव्र असल्याने अनेक लोक गंभीर जखमी झाले होते. पोलीस याप्रकरणी तपास करत आहेत. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज मिळवत तपास सुरु केला आहे. तर भरधाव अन् बेदरकारपणे कार चालविणाऱ्या इसमाला अटक करण्यात आली आहे. जखमी लोकांना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.









