इंफाळ
मणिपूरमध्ये भारतीय सैन्य आणि आसाम रायफल्सने मणिपूर पोलीस, सीआरपीएफ, बीएसएफ आणि आयटीबीपीसोबत मिळून अनेक जिल्ह्यांमध्ये संयुक्त अभियान राबविले आहे. थौबल, चुराचांदपूर, ककचिंग, तेंग्नौपाल, इंफाळ पूर्व आणि इंफाळ पश्चिम जिल्ह्यांमध्ये राबविण्यात आलेल्या अभियानात 4 उग्रवाद्यांना पकडण्यात आले. तर 23 शस्त्रास्त्रs, 10 आयईडी, ग्रेनेड, मोठ्या प्रमाणात दारूगोळा हस्तगत करण्यात आला आहे.









