प्रतिनिधी / बेळगाव
धारवाडनाका चेकपोस्टवर गुरुवारी 4 लाख 18 हजार रुपये जप्त करण्यात आले आहेत. निवडणूक विभागाच्या अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे. ही रक्कम नियमानुसार ट्रेझरीमध्ये जमा केली आहे. धारवाडनाका चेकपोस्टवर वॅगेनर कार अडवून तपासणी केली असता कारमध्ये 4 लाख 18 हजार रुपये रोकड आढळून आली. रकमेविषयी आवश्यक कागदपत्रे हजर करण्यास असमर्थता दर्शविली. त्यामुळे ती रक्कम जप्त करण्यात आली आहे.









