गांजाची विक्री व खरेदी करणार्यांना पकडले राधानगरी पोलिसांची नऊ जणांवर कारवाई
सरवडे प्रतिनिधी
राधानगरी तालुक्यातील मालवे येथील दूधगंगा धरण वसाहतीजवळ गांजा विक्री करण्यासाठी आलेल्या दोघांना व गांजा विकत घेणाऱ्या सात जणांना राधानगरी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडील गांजा, रोख रक्कम,७ मोटरसायकली व ११ मोबाईल असे मिळून ४ लाख ४८ हजार ७०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. असून त्यांच्यावर राधानगरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, राधानगरी तालुक्यातील मालवे येथे दूधगंगा धरण वसाहती जवळ सोमवारी सायंकाळी राहुल कृष्णात पाटील व अनिल बाबुराव तावडे ( दोघे रा. सरवडे) हे सुमारे ७६ हजार रुपये किंमतीचा गांजा विक्री करण्यासाठी आले होते. तसेच संतोष तानाजी कांबळे (तिटवे), अनिकेत सुभाष चौगले (अर्जुनवाडा) दिपक आनंदा सूर्यवंशी (कसबा तारळे), अभिमन्यू महादेव धावरे (तुरंबे )उत्तम तानाजी रानमाळे (सरवडे) संजय सदाशिव माळी (बस्तवडे )अजित दत्तात्रय पाटील (मालवे ) हे सात जण गांजा खरेदी करण्यासाठी आले होते. राधानगरी पोलिसांना याचा सुगावा लागल्याने त्यांनी तात्काळ त्याठिकाणी येवून गांजा विक्री करणाऱ्या दोघांना व गांजा विकत घेणाऱ्या सात जणांना ताब्यात घेतले. तसेच त्यांच्या कडील ३ किलो ८१४ ग्रँम गांजा,१३२२० रुपये रोख रक्कम, ७ मोटरसायकली ,११ मोबाईल असा मुद्दे माल जप्त केला. या प्रकरणी नऊ जणांवर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलिस निरीक्षक स्वाती गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली ए बी पाटील, कृष्णात यादव आदी करीत आहेत