चित्रदुर्ग येथे कारला अपघात : तिघे जखमी : मृत तुमकूर जिल्ह्यातील
बेंगळूर : चित्रदुर्ग जिल्ह्यातील मल्लापूरनजीक महामार्ग क्र. 150 वर कारला झालेल्या भीषण अपघातात चौघेजण जागीच ठार तर तिघे गंभीर जखमी झाले. सोमवारी सकाळी हा अपघात झाला. कारमधील सर्वजण बेळगावहून तुमकूरला परतत होते. यावेळी कारने रस्त्याकडेला थांबलेल्या ट्रकला मागून धडक दिली. या अपघातात संपूर्ण कारचा चक्काचूर झाला. शमशुद्दीन (वय 40), मल्लिका (वय 37), खलील (वय 42), तबरेज (वय 13) अशी अपघातातील मृतांची नावे आहेत. तर नर्गीस, रेहान आणि रेहमान हे गंभीर जखमी झाले. जखमींना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सोमवारी चित्रदुर्ग तालुक्यातील मल्लापूर येथे राष्ट्रीय महामार्ग क्र. 150 वर गॅरेजजवळ थांबलेल्या ट्रकला कारने मागून धडक दिली. सकाळी 7:45 वाजता हा अपघात घडला, अशी माहिती जिल्हा पोलीसप्रमुख धर्मेंद्रकुमार मीना यांनी माहिती दिली. अपघातात कारचा पूर्णपणे चक्काचूर झाला. चित्रदुर्ग ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.









