कोलंबो :
आंध्रप्रदेशचे तीन आणि पु•gचेरीतील एका मच्छिमाराची श्रीलंकेच्या एका न्यायालयाने मुक्तता केली आहे. श्रीलंकेच्या नौदलाने 3 नोव्हेंबर रोजी या मच्छिमारांना ताब्यात घेतले होते. या मच्छिमारांना आता लवकरच भारतीय अधिकाऱ्यांकडे सोपविण्यात येणार आहे. मच्छिमारांच्या नौकाही परत केल्या जाणार आहेत. पी. ब्रह्मानंदन, सी. नागेश्वर राव, के. नुकराजू आणि के श्रीनू अशी या मच्छिमारांची नावे आहेत.









