3 मुलांसह पित्याने घेतला गळफास
वृत्तसंस्था/ गिरिडीह
झारखंडमध्ये धक्कादायक घटना समोर आली असून येथील गिरिडीह जिल्ह्यात एका घरातून रविवारी सकाळी 4 मृतदेह हस्तगत करण्यात आले आहेत. मृतांमध्ये तीन मुलांचा आणि त्यांच्या 36 वर्षीय पित्याचा समावेश असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. पित्याने प्रथम तिन्ही मुलांना लटकवून ठार केले आणि मग स्वत: गळफास घेतला असल्याचे प्रारंभिक तपासात निष्कर्ष काढण्यात आल्याचे अधिकाऱ्याने म्हटले आहे.
गिरिडीहच्या खुखरा येथे ही घटना घडल आहे. संबंधित इसम हा गवंडी काम करत होता. पत्नी शनिवारी माहेरी गेल्यावर त्याने तीन मुलांचा प्रथम जीव घेतला आणि मग स्वत:ही आत्महत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. तर पोलीस याप्रकरणी सर्व पैलू विचारात घेत तपास करत आहे. पोलिसांसोबत फॉरेन्सिक टीमने घटनास्थळी पोहोचून तपास सुरू केला आहे. तर या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे. आत्महत्या केलेल्या इसमाचे सनाउल अंसारी होते, तर त्याची मुलगी 12 वर्षीय आफरीन, 8 वर्षीय जेबा आणि 6 वर्षीय पुत्र सफाउल यांचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळून आला आहे. सनाउल हा गावातच गवंडीकाम करत होता.









