मणिपूर, नागालँड आणि आसाममध्येही जाणवले धक्के
वृत्तसंस्था~गुवाहाटी
म्यानमारमध्ये मंगळवारी सकाळी जोरदार भूकंप जाणवले. राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राने ही माहिती दिली. भूकंपाची तीव्रता 4.7 रिश्टर स्केल इतकी नोंदवण्यात आली. या भूकंपाचे केंद्र मणिपूरमध्ये जमिनीपासून 15 किलोमीटर खाली होते. त्याचे परिणाम मणिपूर, नागालँड आणि आसाममध्येही जाणवले. सुदैवाने या आपत्तीमध्ये कोठेही मोठी जीवित किंवा वित्तहानी झाल्याची नोंद झालेली नाही. 30 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 6:10 वाजता म्यानमारमध्ये 4.7 रिश्टर स्केलचा भूकंप झाल्याची माहिती राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राकडून देण्यात आली. सध्या हिमालयीन प्रदेशात सतत अनेक भूकंप जाणवत आहेत. यापूर्वी सोमवारी रात्री 3.2 रिश्टर स्केलचा आणखी एक भूकंप जाणवला होता. म्यानमार व्यतिरिक्त तिबेटमध्येही 3.3 तीव्रतेचा भूकंप झाला आहे. भूकंपाचे केंद्र जितके उथळ असेल तितकेच ते धोकादायक मानले जाते. यामुळे भूकंपाचे धक्के थोड्या अंतरावरच पोहोचतात, परंतु भयानक विनाश करतात.









