देहराडून
ः उत्तराखंडच्या पिथौरागढमध्ये बुधवारी सकाळी 10 वाजून 3 मिनिटांनी भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपमापन यंत्रावर याची तीव्रता 4.6 रिश्टर स्केल इतकी नोंदवण्यात आली. सध्या तरी भूकंपामुळे कोणतीही हानी झाल्याचे वृत्त नाही. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार, भूकंपाचा केंद्रबिंदू पिथौरागढच्या 20 कि.मी. ईशान्येला 5 कि.मी. खोलीवर होता. सदर भाग नेपाळला लागून आहे. चार दिवसांपूर्वीच नेपाळचा काही भाग भूकंपाने हादरला होता.









