माडग्याळ (जत ) – सांगलीतील पूर्व जत भागात आज सकाळी भूकंपाचे धक्के जाणवले. त्यामुळे जतच्या पूर्व भागात भीतीचे वातवरण पसरले आहे. भूकंपाची तीव्रता ४.५ रिश्टर स्केल असून अद्याप कोणतेही हानी झाली नसल्याची माहिती समोर आली आहे.
जत पूर्वभाग आणि कर्नाटक सीमावर्ती भागात आज सकाळी ६.२२ वाजताच्या सुमारास वीस ते तीस सेकंद भूकंपाचे धक्के जाणवले. यामुळे जत पूर्व ग्रामीण भागात भीतीचे वातावरण पसरले आहे. माडग्याळ, सोन्याळ, बेलोडगी, बोर्गी ,करजगी, कोंतेवबोबलाद ,संख,गिरगाव व मोरबगी आदी गावात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. सकाळी टीव्ही पाहणाऱे व घरात झोपलेल्या नागरिकांना हे धक्के जाणवले आहेत . घरातील भांडी पडणे, बंद पंखे हालणे, पत्र्याचे घर हलणे आदी बाबी नागरिकांना जाणवल्या. भूकंपाचे केंद्र बिंदू विजयपूर (विजापूर) जिल्ह्यात विजयपूर पासून पंधरा किलोमीटर असल्याचे सांगण्यात येत आहे. सदरच्या भुकंपाची तिव्रता ४.५ रिश्टर स्केल आसल्याचे समजते. जत पुर्व भागात तरी कोणतेही नुकसान झाले नसल्याचे समजते. केवळ धक्के जानवले आहेत . काल रात्री पासून जत पुर्व भागात रिमझिम पाऊस सुरु आहे. तो आज सकाळ पर्यंत सुरुच होता. पासामुळे सर्व नागरिक सकाळी सकाळी घरीच आसल्याने भुकंपाचे धक्के नागरीकांना लवकर जाणवले.
Previous Articleइनाम बडसमधील जुनी शाळा इमारत कोसळली
Next Article आपत्ती निवारण विभाग सज्ज









