वृत्तसंस्था/नवी दिल्ली
एकीकडे दमदार पाऊस सुरू असतानाच गुरुवार, 10 जुलै 2025 रोजी दिल्ली-एनसीआरमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. हा भूकंप 4.4 रिश्टर स्केल तीव्रतेचा होता. त्याचे केंद्र रोहतकजवळ असल्याचे वृत्त आहे. गुरुवारी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास दिल्ली, नोएडा, ग्रेटर नोएडा, गाझियाबाद आणि गुरुग्राममध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. जोरदार धक्क्यांमुळे लोक घाबरून घराबाहेर पडले. कोणतेही मोठे नुकसान किंवा जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. मात्र, पाऊस आणि भूकंप एकत्र येणे लोकांसाठी भयावह होते, कारण दोन्ही नैसर्गिक आपत्ती एकत्रितपणे धोका वाढवू शकतात.









