अहमदाबाद :
गुजरात आणि राजस्थानमध्ये शुक्रवारी रात्री 10.15 च्या सुमारास भूकंपाचे धक्के बसले. गुजरातमधील मेहसाणा येथे त्याची तीव्रता 4.2 रिश्टर स्केल इतकी नोंद झाली होती. या भूकंपाचा केंद्रबिंदू जमिनीच्या खाली 10 किमी अंतरावर होता. या हादऱ्यांचा प्रभाव राजस्थानपर्यंत पसरला. जोधपूरमध्येही भूकंपाचे धक्के लोकांना जाणवले. मात्र, कोणत्याही ठिकाणी पडझड किंवा जीवितहानी झाल्याची माहिती शनिवारपर्यंत प्रशासनाला प्राप्त झाली नव्हती.









