इंफाळ
ईशान्य भारताला शुक्रवारी बसलेल्या तीव्र स्वरुपाच्या भूकंपाच्या धक्क्यानंतर शनिवारी पुन्हा मिझोराममधील चंफई परिसरात धक्के जाणवले. भूकंपमापन यंत्रावर याची तीव्रता 4.2 रिश्टर स्केल इतकी नोंदवण्यात आली. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार, शनिवारी दुपारी 03ः17 वाजता भूकंपाच्या धक्क्याने परिसर हादरला. तीव्रता कमी असल्यामुळे या नैसर्गिक आपत्तीमध्ये कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही. तथापि, दिवसाढवळय़ा घडलेल्या या हादऱयांमुळे लोकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले होते.









