नवे घर मिळाल्याने झाले आनंदी
निसर्गाद्वारे निर्मित गोष्टींमध्ये काहीतरी अनोखे असल्यास लोक त्याला पाहून थक्क होतात. याचमुळे दुतोंडी साप, दोन तोंडाचे कासव किंवा चीनमध्ये चार हात असणारे मूल पाहून प्रत्येक जण दंग झाला होता. अशीच काहीच स्थिती सध्या सोशल मीडियावर दिसून येत आहे. लोक एक मांजर पाहून चकित होत आहेत. या मांजराला चार कान आहेत.
रशियात जन्मलेले हे मांजर अत्यंत चर्चेत आहे. या प्राण्याला त्याचे 4 कानच वेगळी ओळख मिळवून देत आहेत. 4 महिन्यांच्या या मांजराचे नाव मिडास असून त्याचे स्वतःचे इन्स्टाग्राम पेज देखील आहे. या पेजला 46 हजारांहून अधिक लोक फॉलो करतात. केवळ कानच नव्हे तर मांजराच्या छातीवर एक पांढऱया रंगाची जन्मखुण आहे, जी हुबेहुब हृदयाच्या आकाराची आहे.

अनेक प्राणीप्रेमींना या मांजराने वेड लावले आहे. अलिकडेच या मांजराला एका महिलेने दत्तक घेतले असल्याने सोशल मीडियावर लोक स्वतःचा आनंद व्यक्त घेत आहेत. तुर्कस्तानची रहिवासी असणाऱया कॅनिस डोसेमेसी आणि तिच्या जोडीदाराने या मांजराला दत्तक घेतले आहे.
कॅनिस पूर्वीपासूनच प्राणीप्रेमी आहे. मिडासच्या पूर्वी कॅनिसकडे 12 वर्षीय श्वान सूजी देखील होता. मिडास आणि सूजी यांच्यात चांगला बंध निर्माण झाल्याचे समजते. दोघांचे परस्परांसोबत खेळतानाची छायाचित्रे इन्स्टाग्रामवर प्रसारित होत असतात.









