लार्सन अॅण्ड टुब्रो यांच्याकडून केली उभारणी
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारताची तंत्रज्ञान क्षेत्रातील राजधानी म्हणून बेंगळुरूला ओळखले जाते. यामध्ये बांधकाम क्षेत्रातील दिग्गज कंपनी लार्सन अँड टुब्रोने अलीकडेच 3डी प्रिंटिंग तंत्रज्ञान वापरून डिझाइन केलेले पहिले पोस्ट ऑफिस उभारण्यात आले आहे. बायोकॉनच्या अध्यक्षा किरण मुझुमदार शॉ यांनी या पोस्ट ऑफिसचे कौतुक केले. बेंगळुरूमधील केंब्रिज लेआउटमध्ये सध्याचे 3डी प्रिंटेड पोस्ट ऑफिस 23 लाख रुपये खर्चून बांधले आहे. परंपरागत इमारतींच्या तुलनेत ही रक्कम 40 टक्क्यांनी कमी खर्ची आल्याची माहिती आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बंगळुरू येथील हलसूरू बाजार येथे भारतातील पहिल्या 3डी प्रिंटेड पोस्ट ऑफिसच्या बांधकामात 3डी प्रिंटिंग तंत्रज्ञानाच्या वापराचे कौतुक केले आहे. यासाठी तंत्रज्ञानाच्या नवनवीन पद्धती वापरल्या जात असल्याचे पाहून बरे वाटले, असे ते म्हणाले. 3डी प्रिंटेड पोस्ट ऑफिस हे प्रिंटिंग क्षेत्रातील एक उदयोन्मुख तंत्रज्ञान आहे जे उत्पादन प्रक्रियेला गती देऊन आणि एकूण उत्पादन गुणवत्ता वाढवून उत्पादनाच्या जुन्या पद्धती बदलण्यास मदत होणार असल्याचेही यावेळी स्पष्ट केले आहे.
विशेष म्हणजे लार्सन अँड टुब्रोने ते 45 दिवसांपेक्षा कमी कालावधीत पूर्ण केले.









