अमेरिकेच्या हवाई प्रांतातील होनोलूलूमध्ये 3,922 पायऱयांची एक शिडी असून जी व्हॅली ऑफ हेकू येथून लोकांना 2,400 फुटांच्या उंचीवर पोहोचविते. ‘स्वर्गाची शिडी’ नावाने प्रसिद्ध या पर्वतीय मार्गावर चढण्यासाठी दरवर्षी शेकडो लोक पोहोचतात, पण आता या ‘स्वर्गाच्या शिडी’ला हटविण्याची योजना तयार केली जात आहे.
हे अत्यंत धोकादायक पर्यटन स्थळ असल्याचे होनोलूलूच्या अधिकाऱयांचे म्हणो आहे. होनोलूलू नगर परिषदेने ‘स्वर्गाची शिडी’ हटविण्यासाठी मागील आठवडय़ात सर्वसंमतीने मतदान पेले आहे. या स्वर्गाच्या शिडीची निर्मिती प्रत्यक्षात 1942 मध्ये अमेरिकेच्या सैन्याने अँटिना लावण्यासाठी केली होती. पुढील काळात या अँटिनाला अमेरिकेच्या तटरक्षक दलाने स्वतःच्या ताब्यात घेतले होते. आता देखील तेथे 2 लाख वॅट क्षमतेचा रेडियो अँटिना दिसून येतो, त्याच्या मदतीने अत्यंत दूरपर्यंत कम्युनिकेशन शक्य आहे.
पण स्वर्गाच्या शिडीवर चढणे बेकायदेशीर असले तरीही तेथे शेकडो लोक पोहोचतात. सुरक्षारक्षकांना टाळण्यासाठी लोक पहाटेच तेथे पोहोचतात. अनेक प्रवास कधीच विसरता येत नसल्याचे अनेक पर्यटकांचे म्हणणे आहे.

पूर्वी ही शिडी लाकडाने तयार करण्यात आली होती, जी काही काळानंतर काँक्रीटने तयार केली गेली. लोक आता सरकारकडून शिडीवर चढण्याची मंजुरी देण्याची मागणी करत आहेत. शिडीच्या देखभालीकरता मोठा खर्च येणार असून हे आर्थिकदृष्टय़ा फायदेशीर नसल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.
होनोलूलू पोलिसांनी शिडीवर चढणाऱया 6 हायकर्सना मार्च महिन्यात अटक केली होती. तसेच पर्यटकांना अवैध चढाई करण्यापासून रोखण्यासाठी एका मोहिमेदरम्यान 93 नोटीस बजावल्या होत्या.
या शिडींवर आतापर्यंत केवळ एकाच मृत्यूची नोंद झाली आहे. गायक अणि हास्य अभिनेता फ्रिट्स हसनपुश यांना 2012 साली चढाई करताना हृदयविकाराचा झटका आला होता. नियमाचे उल्लंघन करणाऱयांवर तेथे 1 हजार डॉलर्सचा दंड ठोठावला जातो, तरीही लोक जुमानत नाहीत.









