नवी दिल्ली :
30 जूनला संपलेल्या आर्थिक वर्ष 2024 मधील पहिल्या तिमाहीत प्रेस्टीज ग्रुपने घर विक्रीतून 3914 कोटी रुपये कमावले आहेत. वार्षिक तत्वावर पाहता कमाईतील वाढ 30 टक्के अधिक नोंदली गेली आहे. कंपनीने 3.83 दशलक्ष चौरस फूट जागेचा प्रकल्प विकासाअंतर्गत व्यवहार केला आहे. प्रकल्पाअंतर्गत 2276 घरांची विक्री करण्यात आली आहे. बेंगळूरच्या या कंपनीने सदरची माहिती शेअर बाजाराला दिली आहे.









