चिकोडी शैक्षणिक जिल्ह्यातील चित्र : दहावी परीक्षा सुरळीत पार
प्रतिनिधी/ चिकोडी
इयत्ता दहावीच्या शनिवारी घेण्यात आलेल्या समाज विज्ञान पेपरला चिकोडी शैक्षणिक जिह्यातील फ्रेशर 376 तर 15 रिपीटर अशा 391 विद्यार्थ्यांनी दांडी मारली. फ्रेशर 43185 पैकी 42 हजार 809 जण हजर तर 376 जण गैरहजर राहिले. 110 रिपीटर्स पैकी 95 हजार हजर तर 15 जण गैरहजर राहिले. एकूण 43 हजार 295 विद्यार्थ्यांपैकी 42 हजार 904 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली तर 391 जण गैरहजर राहिले.
सर्व परीक्षा केंद्रावर चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सीसी पॅमेऱ्यांच्या निगराणीखाली व अधिकाऱ्यांच्या विविध पथकांच्या देखरेखीखाली कोणताही अनुचित प्रकर न घडता आज समाज विज्ञानाचा पेपर सुरळीत पार पडला. अथणी तालुक्मयात 6508 पैकी 6462 जण हजर तर 46 जण गैरहजर, निपाणी 4243 पैकी 4213 जण हजर तर 30 जण गैरहजर, चिकोडी 4734 पैकी 4635 जण हजर तर 99 जण गैरहजर, गोकाक 4584 पैकी 4554 जण हजर तर 30 जण गैरहजर, हक्केरी 6738 पैकी 6693 हजर तर 45 जण गैरहजर, कागवाड 2289 पैकी 2277 हजर तर 12 जण गैरहजर, मुडलगी 7178 पैकी 7141 जण हजर तर 37 जण गैरहजर, रायबाग 7021 पैकी 6929 जण हजर तर 92 गैरहजर राहिले. जिह्यात एकूण 43185 फ्रेशर व 110 रिपीटर अशा 43295 पैकी 42809 फ्रेशर व 95 रिपीटर अशा 42904 जणांनी परीक्षा दिली. तर फ्रेशर 376 व 15 रिपीटर अशा 391 विद्यार्थ्यांनी दांडी मारली.









