ईटानगर
अरुणाचल प्रदेशात वैध इनर लाइन परमिट (आयएलपी) शिवाय वास्तव्य अन् काम करणाऱ्या लोकांच्या विरोधात पोलिसांनी कठोर कारवाई केली आहे. राजधानी क्षेत्रात राबविण्यात आलेल्या विशेष अभियानात 39 जणांना ताब्यात घेण्यात आले. राज्याचे मूळ रहिवासी नसलेले आणि विना आयएलपी वास्तव्य करणाऱ्या लोकांच्या विरोधात ही कारवाई करण्यात आली आहे. पुढील काळातही अशाप्रकारचे अभियान जारी राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.









