वेंगुर्लेतील मदर तेरेसा स्कुल , तर प्राथमिकमध्ये जि.प.सावंतवाडी शाळा नं. 1 ची बाजी
जिल्हास्तरीय स्वच्छ विद्यालय पुरस्कार 2021-22 अंतर्गत जिल्ह्यातील 38 शाळांना पुरस्कार जाहिर झालेले आहेत. या पुरस्कारांत सर्वाधिक गुण मिळविणाऱ्यांत शहरी भागात माध्यमिकमध्ये वेंगुर्लेतील मदर तेरेसा स्कुलने व प्राथमिकमध्ये जि. प. सावंतवाडी शाळा नं. 4 ने तर ग्रामीण भागातील माध्यमिकमध्ये सावंतवाडी तालुक्यातील येथील जवाहर नवोदय विद्यालय, सावंतवाडी चराटे येथील यशवंतराव भोसले इंटरनँशनल स्कुल व प्राथमिकमध्ये देवगडच्या जि. प. इळये शाळा नं. 1 या शाळांचा समावेश आहे.जिल्हास्तरीय स्वच्छ विद्यालय पुरस्कार 2021-22 अंतर्गत जिल्ह्यातील सर्व शाळांना स्वच्छ विद्यालय पुरस्कार पोर्टलवर ऑनलाईन नोंदणी करण्याबाबत कळविण्यात आले होते. त्यानुसार जिल्ह्यातील 1711 शाळांपैकी 1610 शाळांनी स्वच्छ विद्यालय पुरस्कार 2021-22 या स्पर्धेसाठी सहभाग नोंदविला होता.
जिल्हास्तरीय पुरस्कारासाठी फायुव्ह स्टार्स मानांकनासाठी 95 शाळांची पडताळणी केंद्रप्रमुख, विषयतज्ञ, व विशेष शिक्षकांमार्फत करण्यांत आले. 95 शाळांची पडताळणी केल्यावर मुल्यमापन कर्त्यांनी स्वच्छ विद्यालय पुरस्कार पोर्टलवर ऑनलाईन भरलेल्या माहितीच्या आधारे व सिंधुदुर्ग जिल्हा परीषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार जिल्हास्तरीय पुरस्कारासाठी जिल्ह्यातील 38 शाळांची निवड करण्यांत आली. या जिल्हास्तरीय पुरस्कार प्राप्त शाळांची नावे पुढील प्रमाणे आहेत.शहरी भागात सर्वाधिक गुणांवर आधारीत प्राथमिक विभागांत जि. प. सावंतवाडी शाळा नं. 4 तर माध्यमिक विभागांत मदर तेरेसा स्कुल वेंगुर्ले यानी क्रमांक पटकाविला आहे. तसेच ग्रामीण भागांत प्राथमिक विभागांत देवगडच्या जि.प.शाळा इळये नं.1, वैभववाडीच्या जि.प. शाळा नाधवडे ब्राम्हणदेव, कुडाळच्या बँ. नाथ पै सेट्रल स्कुल, कुडाळ यांनी तर माध्यमिक विभागांत सावंतवाडी तालुक्यातील येथील जवाहर नवोदय विद्यालय, सावंतवाडी चराटे येथील यशवंतराव भासले यशवंतराव भोसले स्कुल, सावंतवाडी-चौकुळ येथील चौकुळ इंग्लीश स्कुल यांनी क्रमांक पटकाविले आहेत.









