बाळासाहेब उबाळे,कोल्हापूर
Kolhapur News : वाढते प्रदूषण कमी करण्यासाठी भारत सरकारच्या रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने मोटार वाहन कायद्यात सुधारणा करण्याचा निर्णय घेतला आहे. या अंतर्गत 15 वर्षांहून अधिक जुन्या सर्व शासकीय वाहनांची नोंदणी रद्द करण्यात येणार आहे. ही सर्व वाहने नोंदणीकृत भंगार केंद्रावर स्क्रॅप केली जाणार आहेत.शासनाच्या निर्णयाप्रमाणे कोल्हापूर जिह्यातील 369 शासकीय वाहने आता स्क्रॅप केली जाणार आहेत.
दिवसेंदिवस वायू प्रदूषण वाढत असल्याने,15 वर्षांपेक्षा जुनी वाहने स्क्रॅप करण्याचे आदेश भारत सरकारच्या रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने दिले आहेत.हे आदेश सध्या तरी शासकीय वाहनासाठीच देण्यात आले आहेत. त्यामुळे या नवीन नियमाच्या अंमलबजावणीनंतर, केंद्र सरकारची वाहने, सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेश सरकारची वाहने, महामंडळांची वाहने, सार्वजनिक उपक्रम, राज्य परिवहन वाहने, सार्वजनिक उपक्रम आणि सरकारी अनुदानित संस्थांची वाहने, जी 15 वर्षांपेक्षा जुनी आहेत ती भंगारात जाणार आहेत. या वाहनांमध्ये लष्कराच्या कोणत्याही वाहनाचा सध्या तरी समावेश नाही.
हा नवीन नियम 1 एप्रिल 2023 पासून लागू होणार आहे. या नवीन नियमानुसार कोल्हापूर जिह्यातील 369 शासकीय वाहने आता स्क्रॅप केली जाणार आहेत. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात रस्ते वाहतूक मंत्रालयाने एक मसुदा जारी केला होता, ज्यामध्ये केंद्र आणि राज्य सरकारद्वारे वापरण्यात येणारी 15 वर्षे जुनी वाहने स्क्रॅप करणे आवश्यक असल्याचे म्हटले होते. हा नियम सर्व महामंडळ आणि परिवहन विभागाच्या बस आणि वाहनांना लागू होणार होता. कोल्हापूर केएमटी कडील 54 बसेस देखील स्क्रॅप केल्या जाणार आहेत. अशी माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी दिपक पाटील यांनी दिली. दरम्यान, हा नियम लागू झाल्यानंतर रस्त्यांवरून बरीच सरकारी जुनी वाहने कमी झाल्याचे दिसणार आहे. तर या निर्णयानंतर खासगी वाहने देखील लवकरच स्क्रॅप करण्यासंदर्भात सरकार पाऊल उचलणार आहे.
इंधनावरील वाहनांतून बाहेर पडणाऱ्या धुरांमुळे प्रदूषण-
देशात कोट्यावधी वाहने रस्त्यावर धावत आहेत. इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढला असली तरी पेट्रोल पंपाप्रमाणे चार्जिंग स्टेशन उभारलेली नाहीत. चार्जिंगलाही मर्यादा असून बॅटर चार्ज करण्यासाठी वेळ लागतो. यामुळे अद्यापही इंधनावरील वाहनांचा वापर मोठा आहे. अशा वाहनांतूनच धूर बाहेर पडत असल्यामुळे हवेचे प्रदूषण वाढले आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आणि हवेतील कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण कमी करण्यासाठी पेट्रोल-डिझेलवर चालणारी वाहने रस्त्यावरून हटवण्याची प्रक्रिया सुऊ आहे.
नोंदणीकृत स्व्रॅपिंग सेंटर मध्ये जुनी वाहने स्व्रॅप करणार-
सद्या 355 शासकीय वाहने स्व्रॅप करण्यात येणार आहेत. अधिकृत नोंदणीकृत स्व्रॅप सेंटरमध्येच ही वाहने स्व्रॅप करायची असून 1 एप्रिल पर्यंत ती स्व्रॅप करण्यात येणार आहेत. त्याप्रमाणे प्रक्रिया राबवण्यात येत आहे.
रोहित काटकर, उप- प्रादेशिक परिवहन अधिकारी.
विभागाचे नाव वाहनांची संख्या
कोल्हापूर महापालिका (केएमटी) 54
कोल्हापूर महापालिका (केएमसी) 53
शिवाजी विद्यापीठ 02
कृषी महाविद्यालय 01
कागल नगरपरिषद 02
विभागीय कार्यशाळा,आरोग्य सेवा 12
(परिवहन)
गडहिंग्लज नगरपरिषद 01
मुख्य कार्यकारी अधिकारी,कुरूंदवाड 01
इचलकरंजी महापालिका 09
जिल्हाधिकारी कार्यालय 02
राज्य उत्पादन शुल्क 01
भूविज्ञान आणि खनिकर्म संचालनालय 02
एमएसीबी 06
कार्यकारी अभियंता, यांत्रिकी विभाग 04
मुख्य वनसंरक्षक कार्यालय 03
जिल्हा व सत्र न्यायालय 02
महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळ 02
विभागीय कार्यशाळा 07
सार्वजनिक बांधकाम विभाग 22
कार्यकारी अभियंता सा.बां (दक्षिण) 14
कार्यकारी अभियंता,विशेष प्रकल्प.सा.बां. 06
कार्यकारी अभियंता. सा.बां 08
कार्यकारी अभियंता,इलेक्ट्रिकल 03
पोलीस विभाग 148
—————————-,!0
एकूण 369
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









