सातारा :
जिल्हा नियोजन समिती सातारा यांचेकडून सातारा जिल्हा पोलीस दलासाठी प्राप्त झालेल्या एकूण ३६ वाहने व साधनसामग्रीचा लोकार्पन सोहळा पालकमंत्री शंभुराज देसाई यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी पोलीस अधीक्षक तुषार दोशी, पोलीस उपअधीक्षक (गृह) अतुल सबणीस यांच्यासह पोलीस विभागातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
सातारा जिल्हयामध्ये ३२ पोलीस ठाणे असून कायदा व सुव्यवस्था राखणे, बाढत्या गुन्हेगारीस आळा घालणे, महत्वाचे व अतिमहत्वाचे व्यक्तींचे दौरा बंदोबस्त व इतर बंदोबस्ताकरीता मोटार वाहनांची व इतर साधन सामग्रीची कमतरता भासत होती. त्याअनुशंगाने पोलीस दलाचे आधुनिकीकरण व बळकटीकरण करणे, प्रत्येक पोलीस ठाणे अंतर्गत आपले पोलीस ही संकल्पना अंमलात आणण्याकरीता वाहतूक व्यवस्थेचे बळकटीकरण करणे या नवीन बाबींचा समावेश करण्यात आलेला असल्याने पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी सातारा जिल्हा पोलीस दलास चारचाकी वाहने, दुचाकी वाहने, साहित्य मिळण्याकरीता विनंती प्रस्ताव जिल्हा नियोजन समिती, सातारा यांचेकडे प्रशासकिय मान्यता व निधी मंजूरी करीता सादर केला होता. सदर प्रस्ताबास जिल्हा नियोजन समितीने मान्यता दिली.
त्यानुसार जिल्हा नियोजन समितीकडून सातारा जिल्हा पोलीस दलास सुमारे ३ कोटी ५० लाख रुपये किमतीच्या १५ महिंद्रा स्कॉ पर्पीओ, १ महिंद्रा थार, ४ एसएमएल बस, १६ हिरो प्लेजर स्कुटी अशी एकूण ३६ नविन वाहने, व ४० वॉ टर कुलर, ४० हार्डडिस्क, ४० बॉ डी वॉर्न कॅमेरा, ५० सीसीटीएनएस संगणक, ५६ संगणक, ८२ स्कैनर, ५६ प्रिंटर, ५६ युपीस, ४० ब्रीथ अल्कोहोल अॅनालायझर मशिन, १० ट्राफिक बुथ, ३०० रोड बॅरिकेटस्, २०० फोल्डींग रोड बॅरिकेटस् सातारा जिल्हा पोलीस दलास पुरविण्यात आलेली आहेत. पोलीस विभागाकडून चांगल्या कामाची अपेक्षा सर्व जण करतात यासाठी त्यांना भौतिक सुविधा देण्यात येत आहेत. जिल्हा वार्षिक योजनेतून १५ स्कॉर्पीओ, १ थार, ४ मोठ्या बसेस, दामिनी पथकासाठी १६ प्लेझर स्कूटी मिळाल्या आहेत दामिनी पथकातील महिला पोलीस शाळा, महाविद्यालय, क्लासेस व गर्दीच्या ठिकाणी गस्त घालतील. सातारा पोलीस विभाग यापुढेही उत्तम काम करील असे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी सांगितले.








