एका अहवालामधून माहिती सादर
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
पीडल्बूसीच्या अलीकडील अहवालानुसार, भारतीय स्टार्टअप वातावरणातील निधी मागील वर्षाच्या दुसऱ्या सहामाहीच्या तुलनेत या वर्षाच्या पहिल्या सहामाहीत 298 व्यवहारांमध्ये 36 टक्क्यांनी घसरून 3.8 अब्ज डॉलर झाला आहे. गेल्या वर्षीच्या दुसऱ्या सहामाहीत 5.9 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करण्यात आली होती. फिनटेक, सॉफ्टवेअर एस ए सर्व्हिस ( Fintech, software-as-a-service) ) आणि डि 2 एच यांना वर्ष 2023 च्या पहिल्या सहामाहीत सर्वाधिक निधी मिळाला असल्याची माहिती आहे.
अमित नवका, भागीदार, डील्स आणि पीडब्लूसी इंडियामधील इंडिया स्टार्टअप लीडर म्हणाले, ‘स्टार्टअप कंपन्यांचे पैसे संपणे सामान्य आहे. उद्यम भांडवलदारांकडे (व्हीसी) पुरेसे भांडवल असतानाही स्टार्टअप फंडिंगमध्ये मंदी आहे. भारतातील सक्रिय व्हीसीत कंपन्यांना गेल्या वर्षभरात लक्षणीय निधी मिळाला आहे आणि येत्या काही महिन्यांत गुंतवणुकीचा वेग वाढण्याची आम्हाला अपेक्षा आहे. असेही त्यांनी यावेळी म्हटले आहे.
अहवालात म्हटले आहे की, गेल्या काही तिमाहींमध्ये फंडिंग मार्केटमधील आव्हानात्मक परिस्थिती असूनही, गुंतवणूकदारांनी सकारात्मक वाढ दर्शविणाऱ्या कंपन्यांमधील त्यांची गुंतवणूक दुप्पट करून त्यांच्या पोर्टफोलिओ कंपन्यांना भक्कम पाठिंबा दर्शविला आहे यामुळे अशा काही घडामोडींचा आगामी काळात लाभ होणार असल्याचे संकेत अभ्यासकांनी व्यक्त केले आहे.
…………









